loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर वरचापाट येथील श्री दुर्गा देवीचा शारदीय नवरात्र उत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबर पासून सुरू

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर वरचापाट येथील श्री दुर्गा देवीचा शारदीय नवरात्र उत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ ते मंगळवार, दि. २०.१०.२०२६ पर्यंत श्री दुर्गादेवी मंदिर वरचापाट, गुहागर येथे साजरा होणार आहे. या उत्सवात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दैनदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ६.३० वा.श्रींची षोडषोपचारे पूजा, सकाळी ९ वेदपठण, सकाळी ९.३० ते ११.३० सप्तशती पाठवाचन, दुपारी १२ ते २ प्रसाद, सायं. ७ श्रींचा गोंधळ, आरती, मंत्रपुष्प, रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ पर्यंत रूपे लावणे, दु ०३.४५ ते ०५.०० वा.श्री कलावती आई भजन मंडळ गुहागर वरचापाट यांचे भजन. रात्रौ ९:३०. वा.दुर्गाश्री गीत गायन स्पर्धा उद्घाटन.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवार दि.१२ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३०. वा.दुर्गाश्री गीत गायन स्पर्धा, मंगळवार दि.१३ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९:३०. वा दुर्गाश्री गीत गायन स्पर्धा, बुधवार दि १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा.दुर्गाश्री गीत गायन स्पर्धा महा अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा.सुवासिनी पूजन, दुपारी ३.३० ते ०५ पर्यंत हळदीकुंकू समारंभ, रात्री ९.३०.वा.नादब्रम्ह गोवा मर्दिनी प्रोडक्शन निर्मित दोन अंकी धमाल विनोदी नाटक "जादू मंतर छु मंतर", शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी समूह नृत्य सादरीकरण, शनिवार दि- १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३०. वा जादुचे प्रयोग - जादुगार उदयकुमार, रविवार दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा.कुमारिका पूजन, रात्री ९.३० वा. भजन संध्या स्वरसाधना १)महिला भजन मंडळ वेळणेश्वर, सिद्धी तिवरेकर २)श्री. लक्ष्मी नारायण भजन मंडळ हेदवी, गुहागर बुवा निखील ओक ३)कृपासिंधु भजन मंडळ तळवली गुहागर बुवा. कौशल पिल्वलकर.

टाईम्स स्पेशल

सोमवार- १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. महीलांसाठी रास दांडिया, मंगळवार दि-२० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ११.३० वा. नवचंडी हवन व पूर्णाहुती, दुपारी १२ ते २ वा.महाप्रसाद (विजया दशमी),रात्री ८ ते ९ -सादरकर्ते - संगीत आरती. श्री देव गोपाळकृष्ण आरती मंडळ खालचापाट गुहागर, रात्री ९:३०. वा.श्री परमेश्वर प्रोडक्शन, सावंतवाडी निर्मित बालगंधर्व नांदी ते भैरवी गायक स्वप्नील गोरे, राधा जोशी, वादक ऑर्गन प्रसाद शेवडे, तबला- नीरज भोसले, निवेदक- बाळ पुराणिक, रात्री ११:४५ वा. लळिताचे कीर्तन, ह.भ.प. सुमंत बुवा भिडे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दुर्गादेवी नवरात्र उत्सव वरचापाटच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg