loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पतसंस्थेच्या माध्यमातून अधिक विश्वासार्हता निर्माण करूया, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पतसंस्थेच्या माध्यमातून अधिक विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून संकल्प करुया असे आवाहन पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सुनिल राऊळ यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्हयात १५० पतसंस्था कार्यरत असुन, छोटया मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग वासियांसाठी विविध पातळीवर कर्ज व ठेवीची सेवा देण्याचे महत्वपुर्ण कार्य करत आहे. पतसंस्था या सर्वसामान्य माणसाचा आधार आहेत. अगदी तळागाळातील व्यक्ती पर्यत जाऊन या पतसंस्था काम करत आहेत. त्याबद्दल अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी सर्व पतसंस्थांना धन्यवाद दिले. पतसंस्था चळवळीला अधिक सक्षम व मजबुत करण्यासाठी कर्ज थकबाकी असणा-या किंवा कर्जे भरण्यास टाळाटाळ करणा-या कर्जदारांवर अधिक प्रभावीपणे कर्ज वसुलीची कारवाई करावी, असे मत फेडरेशन अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर जे कर्जदार जाणुनबुजुन कर्ज भरण्यास टाळाटाळ करत आहेत, अशा कर्जदारांवर १०१ ची कारवाई पतसंस्थांनी तातडीने करावी, यासाठी कोणतेही सहकार्य लागल्यास पतसंस्था फेडरेशन सर्वतोपरी सहकार्य करेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचबरोबर पतसंस्थानी सोनेतारण कर्जावर अधिकाधिक भर दयावा व सिंधुदुर्ग वासियांना अधिक माफक दरात सोनेतारण कर्ज वितरीत करावे. त्याचबरोबर त्यांनी असेही विषद केले की, सिंधुदुर्गातील जनतेने जास्तीत जास्त सहकारी पतसंस्था व सहकारी बँका यांचकडेच सोनेतारण कर्जे करण्यासाठी यावेत. पतसंस्था व सहकारी बँका या अगदी कमी व माफक दरामध्ये सोनेतारण कर्जे देत असतात. त्याचबरोबर अनावश्यक चार्जेसही आकारले जात नाहीत. त्यामुळे यामध्ये अत्यंत तातडीच्यावेळी सोनेतारण कर्जे घेण्यास गरजु व्यक्तींना अनावश्यक भुर्दंड पडणार नाही व कोणतेही अवाजवी व्याज आकारले जाणार नाही. तरी जिल्हा वासियांनी सहकारी पतसंस्था व सहकारी बँका यांचकडेच सोनेतारण कर्जे घ्यावीत, असे आवाहन फेडरेशन अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी केले. पतसंस्था चळवळीमध्ये कार्यरत असणारे पतसंस्थांचे संचालक मंडळ, व्यवस्थापक कर्ज वसुली अधिकारी व इतर कर्मचारी यांना अधिक प्रशिक्षित करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असुन, वेळोवेळी होणा-या प्रशिक्षणाचा लाभ हा सर्वांनी घ्यावा व पतसंस्था चळवळीला अधिक मजबुतीकडे, अधिक विश्वासार्हता जपण्याकडे नेऊयात, असे आवाहन फेडरेशन अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी केले.

टाईम्स स्पेशल

फेडरेशनच्यावतीने चालु वर्षामध्ये आंबोली येथे विशेष असे दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनात अनेक तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलेले होते व या अधिवेशनात महाराष्ट्रातुन व सिंधुदुर्गातुन अनेक मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहिलेले होते. यापुढेही पतसंस्थांनी ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी भविष्यात अनेक उपक्रम हाती घेण्यात येतील, असा मनोदय फेडरेशन अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी व्यक्त केला व उपस्थित सर्वाचे आभार मानले. यावेळी कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगांवकर, उपाध्यक्ष सुनिल नाईक, संचालक विष्णु पराडकर, बाबुराव कविटकर, अॅड. समीर वंजारी, सुभाष चौधरी तसेच रमेश बोद्रे व पतसंस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg