loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खेड रेल्वे स्टेशनवर विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात

खेड (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान व स्वच्छता हीच सेवा-२०२६’ अंतर्गत खेड रेल्वे स्टेशन येथे विशेष स्वच्छता मोहीम भाजपा नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात राबविण्यात आली. ‘स्वच्छ खेड रेल्वे स्थानक, सुंदर खेड आणि निरोगी पर्यावरण’ या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेड रेल्वे स्थानक परिसरात आढळणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या व इतर घनकचरा संकलित करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेचा प्रभावी संदेश यावेळी देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्वच्छता मोहिमेत नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नालीताई चव्हाण, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजप खेड तालुका उपाध्यक्ष मनोज गायकवाड, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश बामणे, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशाताई सनगरे, भाजपा ओबीसी महिला मोर्चा खेड शहर चिटणीस अक्षया दांडेकर, संजीवनी शेलार, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, शशांक सिनकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, भाजपा खेड शहर चिटणीस अमित खेडेकर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, भाजपा भटके विमुक्त जाती जमाती खेड तालुका संयोजक साईराज पवार, मिलिंद शिंदे, आनंद खेडेकर, ओंकार पाटणे, रत्नदीप जाडकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg