loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्य वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रास भेट

रत्नागिरी, : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन, सामाजिक सहभाग आणि जनजागृतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अभियानाच्या कालावधीत सागरी जैवविविधता, सागरी पर्यावरण संवर्धन आणि संशोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे मुख्य वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई प्रवीण एन. आर. यांनी दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.४५ या वेळेत भेट दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भेटीदरम्यान प्रवीण एन. आर. यांनी संशोधन केंद्रातील मत्स्यालय व संग्रहालयाची पाहणी केली तसेच केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध संशोधन व विस्तार उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी केंद्रात उभारण्यात आलेल्या ‘सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्रा’ची देखील पाहणी करून त्याबाबतची माहिती जाणून घेतली. केंद्रामार्फत सागरी जैवविविधता संवर्धनासाठी करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून कामाचे कौतुक केले. यावेळी DFO प्रियांका पाटील, RFO प्रशांत निकळजे, विक्रम यादव, राज्य प्रकल्प अधिकारी, UNDP-GCF-ECRICC प्रकल्प, जलजीविका संस्थेचे दशरथ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख, व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतनकुमार चौधरी यांनी प्रवीण एन. आर. यांचे स्वागत करून केंद्रामार्फत सुरू असलेल्या विविध संशोधन, संवर्धन व जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. मनोज घुघुसकर, डॉ. हरीश धमगाये व प्रा. सचिन साटम उपस्थित होते. तसेच UNDP प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक सहायोगी ऋषिकेश भाटकर, मिलिंद डाफळे तसेच किरण पाचरणे, वनपाल, रत्नागिरी तसेच रत्नागिरी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg