loader
Breaking News
Breaking News
Foto

पीकपाणीबाबत शेतकर्‍यांचे अर्ज अजूनही प्रलंबित; मनसे तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांचा आरोप

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील काही शेतकर्‍यांच्या पीक-पाणी नोंदी सातबार्‍यावर करण्याबाबत तलाठी कार्यालयांकडून टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकर्‍यांनी संबंधित तलाठी कार्यालयांकडे अर्ज करूनही त्यांच्या पीक-पाणी नोंदी अद्याप झालेल्या नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकात म्हटले आहे की, पीक-पाणी नोंद ही शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची बाब असून, विविध शासकीय योजना, पीकविमा तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी या नोंदींचे महत्त्व आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नयेत, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. संबंधित तलाठ्यांनी शेतकर्‍यांचे अर्ज मंजूर न केल्यास या प्रश्नावर तालुकास्तरावर मनसेच्या वतीने उत्तर देण्यात येईल, असा इशारा मनसे मालवण तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg