loader
Breaking News
Breaking News
Foto

३२ वर्षे शिक्षण विभागात सेवा बजावणार्‍या दिव्यांग शिक्षकाला चिपळूण पंचायत समितीत न्यायासाठी वणवण!

चिपळूण (प्रतिनिधी) : ३२ वर्षे प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्‍या एका दिव्यांग शिक्षकाला सेवानिवृत्तीनंतर आपल्याच हक्काच्या पैशासाठी भीक मागावी लागत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? जिल्हा परिषद शाळेतील जेष्ठ शिक्षक एजाज महमूद इब्जी हे नोव्हेंबर २०२४ मध्ये ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. शासन नियमानुसार स्वगृही परतण्यासाठी मिळणार्‍या प्रवास भत्त्याचे बिल त्यांनी जानेवारी २०२५ मध्येच सादर केले होते. पण पावणे दोन वर्षे उलटली तरीही ते बिल मंजूर झालेले नाही. सदर निवृत्त शिक्षकांनी गटविकास अधिकारी यांना भेटून निवेदन दिल्याचे समजते. याबाबत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एका अपंग शिक्षकाला वारंवार आपल्या न्याय्य हक्कासाठी फेर्‍या मारायला लावणे उचित आहे का? असे पालकांचे म्हणणे आहे. या २१ महिन्यांच्या काळात इब्जी यांनी तब्बल पाच वेळा लेखी पत्रव्यवहार केला. जुलै २०२५ च्या सेवानिवृत्त समस्या निवारण सभेत प्रभारी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि सेवानिवृत्त संघटनेच्या समोर हा विषय मांडला. पण शिक्षण विभागातील बाबूंनी ही फाईल जणू कचरापेटीत टाकल्यासारखी दुर्लक्षित केली आहे. इब्जी हे अपघातात पाय गमावलेले दिव्यांग शिक्षक आहेत. असे असूनही त्यांना कुबड्यांच्या आधारे पंचायत समितीच्या पायर्‍या चढाव्या लागत आहेत. हा केवळ आर्थिक प्रश्न नसून एका दिव्यांग सेवानिवृत्ताचा हा घोर अपमान आहे. तब्बल पावणे दोन वर्षे एका टेबला वरुन दुसर्‍या टेबला पर्यंत फाईल सरकली नाही. ही आश्चर्याची बाब म्हटली जात आहे.

टाईम्स स्पेशल

३२ वर्षे मी या विभागाची सेवा केली, आणि आज पावणे दोन वर्षे मी माझ्याच हक्काच्या बिलासाठी खेटे मारतोय. हे दिव्यांगांचा अपमान नाही का? असा आर्त सवाल इब्जी यांनी केला. आता या मुजोर यंत्रणेविरोधात थेट राज्य दिव्यांग आयुक्त आणि दिव्यांग कल्याण मंत्रालय, मुंबई येथे तक्रार दाखल करणार असल्याचा अंतिम इशारा एजाज इब्जी यांनी दिला आहे. आता तंरी झोपी गेलेले प्रशासन जागे होईल का?

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg