loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलची श्रेया खोत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

बांदा (प्रतिनिधी) - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, एकता प्रभाग संग मळेवाड तसेच महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत पारिजात हॉल, दांडेली-कोंडुरा तिठा येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य बालसभा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील मोठ्या गटाच्या वक्तृत्व स्पर्धेत आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी श्रेया श्रीकृष्ण खोत हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोसचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी अनिल नाईक, मुख्याध्यापक तानाजी वरक, सर्व संस्था सभासद, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg