loader
Breaking News
Breaking News
Foto

महेश संसारे यांची भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड

वैभववाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाचा 'शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे. ​किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते महेश संसारे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, संघटक प्रसन्न देसाई, प्रदेश सदस्य मोहन सावंत, माजी अध्यक्ष अमृत चौगुले, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे सदस्य दीपक भगत यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या फेरनिवडीबद्दल आभार मानताना महेश संसारे यांनी शेतकरी हितासाठी, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत संघटनात्मक जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. त्यांच्या या फेरनिवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय व कृषी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg