loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निवे येथे सेवा संकल्प अभियानाचे आयोजन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील निवे व हातीव पंचायत समिती गणातील विविध अंगणवाडीमध्ये, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याचा सन्मान करण्यात आला. एक सुजाण आणि सुदृढ नागरिक होण्याची, शिक्षणाची पहिली पायरी जिथून सुरु होते त्या अंगणवाडी सेविका यांचा सन्मान करण्यात आला.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा देणाऱ्या अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजप संगमेश्वर दक्षिण मंडल मधील घोडवली येथील सम्राटवाडी (कुणबीवाडी) अंगणवाडी, घोडवली मिनी अंगणवाडी तसेच मुरादपूर येथे मुरादपूर वरचीवाडी अंगणवाडी, मुरादपूर पातिचीवाडी येथे भाजपा संगमेश्वर दक्षिण महिला मोर्चा पदाधिकारी यांनी भेट दिली. अंगणवाडी मध्ये जाऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. तेथील स्तनदा आणि गरोदर मातांशी संवाद साधण्यात आला. विविध शासकीय योजनाची माहिती देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

महिलांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्याला मिळणाऱ्या मातृ वंदना,लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना सुकन्या योजना यांसाठी त्यांचे आभार मानले. अंगणवाडी सेविकांनी सुद्धा गहिवरून जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या,आभार मानले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सेविकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण च्या अध्यक्षा रुपाली सुर्वे, वैदेही बने, श्रीयांका गुरव, श्रद्धा साडविलकर, सायली दळवी, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg