loader
Breaking News
Breaking News
Foto

‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदींच्या संबोधनाचे खेडमध्ये थेट प्रक्षेपण

खेड (प्रतिनिधी) : ‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या व्यापक संकल्पनेतून आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष संबोधनाचे थेट प्रक्षेपण खेड येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाहिले. हा कार्यक्रम गणेश कृपा मंगल कार्यालय, खेड येथे संपन्न झाला. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी “विकास देशाचा, विकास कोकणचा आणि विकास माझ्या गावचा” असा प्रभावी मूलमंत्र देत प्रत्येक कार्यकर्त्याला गावपातळीवरील विकासाचा ठोस आराखडा तयार करून तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिशा देताना आमदार जठार म्हणाले की, देशातील शेवटच्या सामान्य नागरिकाचा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने २०४७ पर्यंतच्या ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील भाजप कार्यकर्त्याचे घर हे सर्वसामान्यांसाठी हक्काचे कार्यालय बनले पाहिजे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनी ‘गाव चलो’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक वाडी-वस्तीवर पोहोचून ग्रामस्थांच्या समस्या समजून घ्याव्यात व गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करावा, असे स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ संघटनात्मक कामकाजापुरते मर्यादित न राहता गावोगावच्या मूलभूत सोयी-सुविधा, विकासकामे आणि लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या सोहळ्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच पक्षाच्या संघटनात्मक रचनेला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्यांचे नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या भव्य सभेला भाजपा नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, युवा मोर्चा प्रदेश सचिव ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, कोकण पदवीधर प्रकोष्ठ कोअर कमिटी सहसंयोजक अजय दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नगरसेविका वैभवी खेडेकर, दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका जया साळवी, माजी नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका आशा सनगरे, शहर चिटणीस ममता दांडेकर, संजीवनी शेलार, आर्या कारेकर, ट्रान्सपोर्ट सेलचे उपजिल्हाध्यक्ष निलेश बामणे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश भुवड, सुयश खेडेकर, तुषार पवार, अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, वैजेश सागवेकर, धीरज पटेल, शुभम गायकवाड, विशाल होळकर, अविराज मोरे, स्वराज गांधी, दत्तात्रय मोरे, विजय गुप्ता, अनिकेत पवार, सर्वेश पवार, बाळू वर्मा, राहुल प्रभू, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह तालुक्यातील विविध आघाड्यांचे प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg