वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून जलसंधारणाचा कार्यक्रम पार पडत असून ग्रामस्थांच्या श्रमदानातून झोंबडी नदीपात्रात बंधारे उभारण्यास सुरुवात झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा "उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद. मिळत आहे.यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाची कमतरता जाणवत असून, महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील झोंबडी ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देत नदीपात्रात बंधारे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांनी पुढाकार घेत दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी शैक्षणिक व विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. या ग्रामसभेत सरपंचानी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांना एकत्र करून भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नदीपात्रात योग्य ठिकाणी बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले. या नियोजनाची तातडीने अंमलबजावणी करत दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी झोंबडी नदीपात्रात बंधारे घालण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत झोंबडी तेलीवाडीतील ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन श्रमदानातून या कामात सहभाग नोंदविला. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता नदीपात्रात अडवले जावे, भूजलपातळी वाढावी तसेच आगामी उन्हाळ्यात गावातील पाणीटंचाई कमी व्हावी, या उद्देशाने बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येत आहे.
या जलसंधारणाच्या उपक्रमात शंकर लांजेकर, वासुदेव लांजेकर, तुकाराम लांजेकर, प्रभाकर लांजेकर, शशिकांत लांजेकर, विष्णू लांजेकर, विकास पवार, दत्तुराम पवार, महेश लांजेकर, गणेश लांजेकर, ग्रामसेवक दिपक गायकवाड तसेच सरपंच अतुल लांजेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे गावाच्या पाणीप्रश्नासाठी केवळ शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून जलसंधारण करण्याचा आदर्श निर्माण झाला आहे. भविष्यातही नदीपात्रातील आवश्यक ठिकाणी बंधारे उभारून पाणीसाठा वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.“आज अडवलेले पाणी उद्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल,” या उद्देशाने झोंबडी ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार परिसरातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे सरपंच अतुल लांजेकर यांनी सांगितले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.