loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुरडे येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान

खेड (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुरडे येथील अंगणवाडी केंद्रांचा सन्मान सोहळा पार पडला. मुरडे सुतार रामवाडी, मुरडे खोत शिंदेवाडी, मुरडे गोठल आणि मुरडे मोहल्ला (ता. खेड) येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान खेड नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका म्हणजे निस्वार्थ सेवेचं दुसरं नाव आहे. कमी मानधनातही त्या दिवस-रात्र बालकांच्या पोषण, आरोग्य आणि मातांच्या काळजीसाठी झटत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्षा सौ. उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा सौ. आशा सनगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg