loader
Breaking News
Breaking News
Foto

योग्य मार्गदर्शनाने दर्जेदार बुद्धिबळपटू तयार होतील - शरद वझे

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - योग्य मार्गदर्शन व शास्त्रीय पद्धतीने खेळात सातत्य राखल्यास ग्रामीण भागातून भविष्यात दर्जेदार बुद्धिबळपटू तयार होतील, असा विश्वास १० हजार पेक्षा जास्त खेळाडूंसोबत बुद्धिबळ खेळलेल्या, मुंबईतील जेष्ठ बुद्धिबळपटू शरद वझे यांनी तळवडे येथे व्यक्त केला. शहरी भागापुरते मर्यादित असलेल्या या खेळाला प्रोत्साहन मिळावे, ग्रामीण भागातूनही बुद्धिबळपट निर्माण व्हावेत या उद्देशाने ज. गं. पेडणेकर माध्यमिक विदयालय तळवडे येथे अनोखी एकाच वेळी अनेक विदयार्थाशी खेळता येणारी ’सायमल’ प्रकारची स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी सलग पाच तास, श्री. वझे यांच्यासोबत १०० विद्यार्थ्यांचा सामना रंगला. कार्यक्रमाचे उद्घाटन शरद वझे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, चेस अकॅडमीच्या सदस्या सुजाता वाघधरे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg