loader
Breaking News
Breaking News
Foto

CJP आंदोलनपूर्वी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई ,६०० जणांना ताब्यात घेतले , सकाळपासून धरपकड सुरु. पुढे काय ?

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये शनिवार 10 ऑक्टोबर 2026 ला प्रस्तावित कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो तरुण पोहोचले आहेत.पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन करणार आहेत या दरम्यान दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतून अजून पर्यंत 600 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, सकाळपासूनकारवाई सुरूच आहे. दिल्लीत ३५,००० हून अधिक सुरक्षा जवान आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत। जंतर-मंतर परिसरात बॅरिकेडिंग करून कडक पहारा दिला जात आहे. सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी आकाशात ड्रोन्सचा वापर केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही.कनॉट प्लेस, जनपथ, संसद मार्ग आणि सीमा भागांवर कडेकोट तपासणी सुरू असून अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली आहे, तरीही मोठ्या संख्येने तरुण आंदोलन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली पोलिसांनी स्थानिक पातळीवर आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेत पूर्ण रात्र कारवाई सुरू ठेवली होती. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होत असल्याने आज होणारे आंदोलन हे अतिशय लक्षवेधी ठरणार आहे, ज्या परिसरामध्ये आंदोलन होत आहे तिथे इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे त्यामुळे तेथे काय घडले? याची माहिती लगेच उपलब्ध होणार नसल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आंदोलनाकडे केंद्रित झाले आहे.सुरक्षेच्या कारणास्तव जंतर-मंतरकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले असून काही ठिकाणी इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. पुढे काय ? याबाबत माहिती आम्ही देणार आहोत .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg