मुंबई : राज्यात लवकरच सुरु होणाऱ्या वॉटर कप अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणविषयक कामाच्या अनुषंगाने बैठक घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून या मोहिमेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत .
दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अडचणीच्या काळात समर्पित भावनेने जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या बैठकीत निश्चित झालेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययोजना तयार करावी. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारण्याबरोबरच कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण प्रणाली विकसित करावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून परस्पर समन्वयातून अंमलबजावणी करावी. ही कामे केवळ कागदावरील नियोजनापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात परिणामकारकपणे पूर्ण व्हावीत. पहिला #पाऊस पडताच #पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाच्या संरचना सज्ज असतील आणि त्यातून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होईल, असे नियोजन व अंमलबजावणी करावी. या प्रयत्नांतून गावांना दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकता येतील आणि जनतेला मोठा दिलासा मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे .
या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.