loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आयुष जाधवची सुवर्ण भरारी! रोटरी स्कूल, खेडच्या आयुषची महाराष्ट्र संघात निवड; राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे नेतृत्व!

खेड – प्रतिनिधी : रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडचा प्रतिभावान खेळाडू आयुष जाधव याने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. या दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावर त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून, आगामी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. आयुषच्या या यशामुळे खेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद, अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने दिनांक ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अकोला येथे राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या ६३ किलो वजनी गटात आयुष जाधव याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. लातूर, अमरावती, नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबई विभागांतील प्रतिस्पर्धी खेळाडूंशी अटीतटीच्या लढती देत त्याने आपल्या कौशल्याची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची प्रभावी छाप पाडली. सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि महाराष्ट्र संघातील स्थान निश्चित केले.

टाइम्स स्पेशल

आता आयुषसमोर राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान असून, दिनांक २२ ते २६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत तो महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. राज्यस्तरावर मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रीय स्पर्धेतही तो आपल्या खेळाच्या जोरावर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आयुषच्या या उल्लेखनीय यशामागे क्रीडा शिक्षक श्री. कृणाल चव्हाण सर आणि तायक्वांदो मार्गदर्शक श्री. पंचशील चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आयुषच्या या सुवर्ण यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देत त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg