loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील महिला विद्यालयात भयावह घटना, विद्यार्थीनीशी शिक्षकाचा अनुचित प्रकार

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरीतील भर मध्यवस्तीत असलेल्या महिला विद्यालयात भयावह प्रकार घडल्याचे आज उघडकीस आले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. तेथील एक शिक्षक वर्गातील मुलींना त्रास द्यायचा, असभ्य वर्तन करायचा व मोबाईलवर लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे त्यांना मेसेज पाठवायचा. ही घटना रत्नागिरी बस स्टँडसमोर असलेल्या महिला विद्यालयात घडली. दहावीच्या वर्गात शिकवणारा हा शिक्षक मुलींना मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. अनेक मुलींची याबाबत तक्रार होती. एक विद्यार्थीनी काहीशी नर्व्हस वाटल्याने त्या मुलीच्या आईने खोदून विचारले तेव्हा हे सर्व बाहेर पडले त्याची खुलेआम चर्चा सार्‍या रत्नागिरी शहरात आता सुरु झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे सर्व होताच अनेक पालक नेमके काय झाले याची चौकशी करण्यासाठी महिला विद्यालयात दाखल झाले. त्या शिक्षकाला आतील रुममध्ये ठेवण्यात आले होते. त्याला बाहेर आणा अशी मागणी करण्यात आली. आरडाओरडा सुरु झाला, हे ऐकून नागरिक मोठ्या संख्येने महिला विद्यालयात आले. भर वस्तीत व स्टँडसमोर हे घडल्याने याचा मोठा बोलबाला झाला. स्टँड व बाजारपेठेतून धावून आलेल्या नागरिकांनी त्या शिक्षकाला पकडून बाहेर आणले व यथेच्छ रगडले. त्यावेळी एक शिपाई त्या शिक्षकाच्या मदतीला धावला व त्याने एका नागरिकाला लाथ मारली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले व संतप्त जनतेने त्या शिपायाला देखील रगडले. स्टँडसमोर भर बाजारपेठेत हे घडल्याने पत्रकार आणि पोलिसही आले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान कुणीतरी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना फोन केला तेव्हा संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, सतीश शेवडे, श्री. मनोज पाटणकर, ऍड. विजय साखळकर, श्री. राजन मलुष्टे व अन्य काही संस्था पदाधिकारी तेथे दाखल झाले. ही बाब अतिशय गंभीर असून प्रथमेश चंद्रकांत नेवले या शिक्षकाला निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रकारांना व उपस्थित नागरिकांना सांगितले. त्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांनी ‘त्या’ शिक्षकाला पोलिस स्टेशनला नेले. सोबत ५ पीडीत विद्यार्थीनी, त्यांचे पालक व संतप्त नागरिकही पोलिस स्टेशनला गेले असून पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts