loader
Breaking News
Breaking News
Foto

अनुस्कुरा घाटात सांगली-राजापूर बस थोडक्यात बचावली

पाचल (तुषार जाधव) : राजापूर-कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात आज दिनांक १३ जाने. २५ रोजी सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणार्‍या बसला अनुस्कुरा घाटात सकाळी १०.३० वाजता ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने मोठा अपघात टळला. त्यांच्या खबरदारीमुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. या बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. हे सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. दरम्यान या गाडीने राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पाचल तलाठी सतीश शिंदे व राजापूर बस व्यवस्थापक हे देखील प्रवास करीत होतें, त्यांनीही मोठया अपघातातून वाचल्याची प्रतिक्रिया दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts