loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वतःचे अपयश झाकण्यासाठीच राणेंकडून वक्तव्ये; आंदोलन करण्यास शिवसैनिक मागे हटणार नाही , हरी खोबरेकर यांचा इशारा

मालवण (प्रतिनिधी) चिपी विमानतळाला टाळे ठोकले तर वैभव नाईक यांच्या घराला टाळे ठोकू, असे वक्तव्य करणाऱ्या खास. नारायण राणे यांना ते खासदार आहेत, एक लोकप्रतिनिधी आहेत याचा विसर पडला आहे. गेले काही वर्षे सुरु असलेली चिपी विमानतळावरील मुंबई - सिंधुदुर्ग - मुंबई विमान सेवा नारायण राणे खासदार झाल्यावर बंद पडली. खासदार असूनही ते विमानसेवा सुरु करू शकलेले नाहीत, हे त्यांचे अपयश असून ते स्वतःचे अपयश झाकण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी मालवण कुडाळ मधील ७३ हजार जनता आमच्या पाठीशी आहे, हे राणे यांनी विसरू नये. ७३ हजार जनता पाठीशी असल्याने कुठलेही आंदोलन करण्यास आम्ही शिवसैनिक मागे हटणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखेत पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या समवेत माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपतालूकाप्रमुख गणेश कुडाळकर, प्रसाद चव्हाण, सौ. दीपा शिंदे, सौ. निनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, दत्ता पोईपकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts