loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ केल्याची मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग यांच्या बाबतीत महसूल विभागातील एका अधिकाऱ्याला खालच्या भाषेत आणि अर्वाच्य शब्द वापरून शिवीगाळ केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्याने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याबाबतचं निवेदन उदय सामंत यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय महसूल कर्मचारी संघटनेला देखील त्यांनी याबाबतचा अर्ज दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात काय कारवाई केली जाणार? जिल्हाधिकारी यांनी शिव्या देण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न कर्मचारी वर्गाकडून विचारला जात आहे. खासगीमध्ये याबाबतच्या तक्रारी आणि चर्चा होत होत्या. पण जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आता कर्मचार्‍याने थेट लेखी तक्रार दाखल केल्याने कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महसूल जमिनीसंदर्भातील वादाच्या अनुषंगाने अर्जदार चौघुले यांनी PMOPG पोर्टलवर 07/01/2024 रोजी केलेली तक्रार विभागीय कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईसाठी प्राप्त झाली आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी यांनी मला तुम सब लोग घंटा काम करते हो क्या भोसडीके, सब बेअक्कल है, हरामखोर, बदमाश अशा शब्दांचा वापर करुन मला कार्यालयात अपमानित केल्याचे महसूल कर्मचारी रोशन कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. कांबळे यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहून आपल्या स्तरावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही केली.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

दरम्यान चांगली कामगिरी चा प्रभाव असता असे कसे घडले ? जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची बाजू समजू शकली नाही ,नेमका प्रकार काय आहे? याबाबतची उत्सुकता आता कार्माचारी वर्गासह जनतेत शिगेला पोहोचणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts