loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ’इट राईट’- बाल रक्षा भारत संस्थेचा उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) - शालेय विद्यार्थ्यांना वैयक्तिक शारीरिक स्वच्छ्ता, आरोग्य तसेच संतुलित आहार याचे महत्व अंगी बानविण्याच्यादृष्टीने जिल्हयातील निवडक शाळांतील ४० शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर बाल रक्षा भारत अभियानच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापक अपर्णा जोशी, किरण थोरात, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या संप्रवी कशाळीकर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, पर्यवेक्षक संजय पाटील, जिल्हा प्रकल्प प्रमुख सातार्डेकर, आकाश मनचेकर उपस्थित होते. यावेळी बाल रक्षा भारत संस्थेतर्फे देशभरात अनेक राज्यात उपक्रम सुरु असून महाराष्ट्रातील मुंबई व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याचे अपर्णा जोशी यांनी सांगितले. तसेच संस्थेतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांचे स्वरुप व माहिती याबद्दलही मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts