loader
Breaking News
Breaking News
Foto

’अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुका अव्वल तर राज्यात द्वितीय

मालवण (प्रतिनिधी) - ’एक देश एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबवण्यात येणार्‍या ’अपार आयडी’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुका हा अव्वल तर राज्यात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. दरम्यान, मालवण तालुका शिक्षण विभागातील सर्वांच्या एकत्रित सांघिक कामगिरीचे हे यश असल्याची प्रतिक्रिया मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली आह. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणामध्ये आमुलाग्र बदल करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रशासनाकडून राज्यातील प्रत्येक विदयार्थ्यांना ’अपार’ आयडी तयार करून घेण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार मालवण तालुक्यातील शालेय विदयार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे काम सुरु आहे. तालुक्यात एकूण १० हजार ५८५ विदयार्थी असून १० हजार २३९ विदयार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करुन जिल्हयात प्रथम क्रमांक तर संपूर्ण राज्यात मालवण तालुका दुसर्‍या क्रमांकावर आहे. मालवण तालुक्याच्या एकूण ९६.७९% विदयार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts