loader
Breaking News
Breaking News
Foto

साहित्यिक जयवंत दळवी स्मारक समितीची पहिली बैठक संपन्न

सावंतवाडी (वार्ताहर) : सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक जयवंत दळवी स्मारक समितीची पहिली बैठक नुकतीच शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक सचिन दळवी यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत करून स्मारकाचे स्वरूप कसे असावे या संदर्भात मते मांडण्याची विनंती सदस्यांना केली. चर्चेअंती दळवी यांचे स्वतंत्र स्मारक आरवली या त्यांच्या गावीच त्यांच्या घराच्या परिसरात व्हावे, असे सर्वानुमते ठरले. स्मारकासाठी आवश्यक जमिनीचा आकार, स्मारकाचे स्वरूप,स्मारकाचा ढोबळ आराखडा, अंदाजे खर्च,विश्वस्त मंडळाची स्थापना व पंजीकरण, प्रकल्प अहवाल,तज्ञांचा सल्ला इत्यादी संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कार्यवाह तथा निवृत्त प्राचार्य प्रा.गजानन मांद्रेकर यानी स्मारक निर्माण कार्यातील विविध कामांची यादी सादर केली. समितीचे उपाध्यक्ष नामवंत कवी विनय सौदागर, सदस्य तथा आंबा व्यावसायिक सचिन गावडे, शिरोडा रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा आंबा वाहतूकदार जनार्दन पडवळ यांनी यावेळी बहुमूल्य सूचना केल्या. येत्या पंधरवड्यात करावयाच्या कामांची आखणी केल्यावर अध्यक्ष सचिन दळवी यानी सर्व समिती सदस्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts