loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर जीवनदूत गौरव प्रमाणपत्राने सन्मानित

खेड,(प्रतिनिधी) - महामार्गावर अपघात घडल्यास तातडीने मदतीसाठी धावून जात रुग्णांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याकरिता सदैव तत्पर असणार्‍या स्वामी नरेंद्र महाराज अँब्युलन्स चे. चालक व सामाजिक कार्यकर्ते सूरज सुरेश हंबीर यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्यावतीने जीवनदूत गौरव पत्राने सन्मानित करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २०२४ मध्ये झालेल्या प्राणांतिक, गंभीर व किरकोळ अपघातप्रसंगी तातडीने अपघातस्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सूरज हंबीर यांनी केलेल्या लोकाभिमुख कामगिरीची दखल घेत त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यापूर्वी त्यांचा विविध संघटनांच्या मार्फतही सन्मान झाला आहे. यावेळी चिपळूण येथील सत्यम पवार, हातखांबा येथील दिनेश केतकर, नांदगाव येथील अमोल तेली यांनाही गौरवण्यात आले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे जिल्हाधिकारी सिंग, करपे, ताम्हणकर, जयश्री गायकवाड, मोटर वाहन निरीक्षक जाधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts