loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे रत्नागिरी शहर अध्यक्ष पदी मिलिंद भाटकर यांची निवड

रत्नागिरी (प्रतिनिधी) - मनसेच्या प्रभारी शहरअध्यक्ष पदी मिलिंद उर्फ बाबय भाटकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांनी पत्र देऊन केली. शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी कौटुंबिक कारणास्तव शहरअध्यक्ष पदावरती कार्यरत राहणे असमर्थ असल्याचे तसेच फक्त महाराष्ट्र सैनिक म्हणून सदैव पक्षासोबत असू असे जिल्हाध्यक्ष यांना कळविले होते. म्हणून जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांनी आज प्रभारी नियुक्ती केली. मिलिंद भाटकर हे मनसेच्या स्थापने पासून कट्टर महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यरत आहेत. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच रत्नागिरी शहरातील अनेक समाज कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्या सोबत शहर सचिव पदी प्रभात सुर्वे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष पदी गौरव चव्हाण यांची देखील नियुक्ती करण्यात आली. जुन्या कार्यकर्त्यांना कार्यरत करून सौन्दळकर व उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी मनसे बळकट करून आगामी स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणूकामध्ये ताकतीने उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. यां प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, मा. तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, प्रभात सुर्वे, गौरव चव्हाण, तनिष सुर्वे इत्यादी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts