loader
Breaking News
Breaking News
Foto

अपना सहकारी बँक संचालकपदी अजय बिरवटकर

खेड,(प्रतिनिधी) - महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांची अपना सहकारी बँकेच्या संचालकपदी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिरवटकर यांनी सहकार क्षेत्रात विविध स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांची संचालकपदी निवड झाली आहे. राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेचेही ते माजी अध्यक्ष असून विद्यमान संचालाक आहेत. धामणी येथील श्रीमान आर. जी. काते विद्यामंदिरचे ते चेअरमन असून जिल्हा नियोजन समितीवरही बिरवटकर कार्यरत आहेत. या जबाबदार्‍या सांभाळत असताना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजय बिरवटकर यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या कार्याची दखल घेत अपना बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts