loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी सरपंचाला मारहाण व अवैध वाळू उपसाप्रकरणी कारवाई न झाल्याने प्रजासत्ताक दिनी उपोषण, उद्योजक अब्दुल्ला नाडकर यांनी दिला इशारा

खेड ,( प्रतिनिधी ):-बेकायदेशीर वाळूचा उपसा प्रकरणाविरोधात भूमिका घेतल्याचा राग मनात धरून हॉकी स्टीकने माजी सरपंचाना मारहाण केल्याप्रकरणी कारवाई व विना रॉयल्टी वाहतूक प्रकरणी कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ दि. २६ जानेवारी रोजी प्रजास्ताक दिनी लोककल्याण ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दल्ला हुसैन नाडकर व बहिरवलीचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) जिल्हा उपाध्यक्ष सलीम चौगुले यांनी खेड तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. बहिरवली खाडीतील बहिरवली नं. १ येथील दिवाचा बेट येथे बेकायदेशीर सक्शन पंपाने आणि बार्झने वाळूचा उपसा होत असल्याप्रकरणी तहसिलदार सुधीर सोनावणे, मंडळ अधिकारी राजाराम धुळे यांना समवेत घेऊन पाहाणी केल्याचा राग मनात धरून बशीर हमदुले यांनी वाळू माफियांना व आपल्या सहकाऱ्याना घेऊन दि. ०८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८ वा हॉकी स्टीकने बहिरवलीचे माजी सरपंच सलीम चौगुले यांना मारहाण केली. तसेच ६ सक्शन पंप फोडल्याप्रकरणी, एका बार्जवर मीठ टाकून कारवाई केली. प्रत्यक्षात कारवाई न केल्याने बेकायदेशीर अवैध वाळूचा उपसा होत आहे तसेच विना रॉयल्टी वाहतूक होत आहे. याबाबतचे लेखी निवेदन आयुक्तांना व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी दि. २६ जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालय खेड यांच्या समोर उपोषणास बसण्याचा इशारा अब्दल्ला हुसैन नाडकर व सलीम चौगुले यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बहिरवली खाडीत, म्हाप्रळ, अडखळ, आंजर्ला आदी ठिकाणी सक्शन पंपाने वाळूचा उपसा होत आहे. याबाबतची लेखी निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली असताना अद्यापही कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ नाईलाजास्तव दि. २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसणार आहे. तसेच याबाबत दि. २० जानेवारी रोजी आयुक्त श्री. महाजन यांची भेट घेणार आह, अशी माहिती श्री. नाडकर यांनी दिली. खेड तालुक्यातील बहिरवली, दिवा बेट, दापोली तालुक्यातील आंजर्ले, केळशी, हर्णे, म्हसोंडा, सारंग, मालदोली, अडखल, मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ, चिपळूण मधील करंबवणे, मालदोली आदि ठिकाणी येथे विना रॉयल्टी अवैध/ बेकायदेशीर वाळूचे उत्खनन सुरू आहे. मंडल अधिकारी तलाठी व स्थानिक अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. या वाळू उत्खननांसह होणाऱ्या चोरट्या वाहतुकीच्या अनेक तक्रारी खेड, दापोली, चिपळूण, मंडणगड अशा सर्व तहसिलदार व महसूल विभागाकडे सातत्याने पत्राद्वारे झाल्या आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे चोरटा वाळू व्यवसाय तेजीत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाने येथे कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही छुप्या पध्दतीने हा व्यवसाय चालवला जात आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने सेक्शन पंपाने वाळू उत्खनन करण्यास बंदी घातली आहे. तरीही वाळू उत्खनन संक्शन पंपाने होत असल्याबाबतचे तक्रार अर्ज खेड तहसिलदार यांच्याकडे देऊनही कारवाई होत नसल्याचे संबंधित तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या विषयी गंभीरपणे दखल घेत या बाबतचा जाब विचारला आहे. तसेच २६/०१/२०२५ रोजी श्री. सलीम चौगुले, व श्री. अब्दुल्ला नाडकर हे तहसिलदार ऑफिस खेड समोर उपोषण करणार आहेत .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts