loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटात गोव्याकडे जाणार्‍या कंटेनरची कठड्याला धडक

दोडामार्ग,(प्रतिनिधी) - मंगळवारी तिलारी घाटातून माल भरलेला कंटेनर गोवा येथे जाण्यासाठी घाट उतरून खाली येत असताना चौथ्या टनावर जयकर पॉईंट या ठिकाणी धोकादायक चढ उतार येथे ब्रेक न लागल्याने वाहन सरळ संरक्षण कठड्याला धडकून अडकून राहिले. कठडा तुटला असता तर वाहन दरीत गेले असते. यात कुणी जखमी झाले नाही. पण वाहनाचे नुकसान झाले पण. तिलारी घाटातील जयकर पॉईंट या ठिकाणी गेल्या अनेक वर्षात अनेक अपघात झाले. या घाटातून दररोज ये जा करणार्‍या वाहन धारकांना घाटातील रस्ता वळणे परिचित आहेत. शिवाय नवीन वाहन धारकांना आवश्यक काळजी घेण्यासाठी बांधकाम विभाग यांनी सूचना फलक लावले आहेत. पण याकडे दुर्लक्ष करून घाट उतरून येणारे नियम धाब्यावर बसवून येतात मग अपघात होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts