loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार निलेश राणेंच्या दणक्यानंतर मालवणमधील समस्यांवर कार्यवाही

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील विविध समस्यांबाबत नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार आमदार निलेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी मालवण शहरात रात्री फिरून स्पॉट पंचनामा केल्यानंतर मालवण नगरपरिषद प्रशासनाला जाग आली आहे. मच्छिमार्केट येथील कचरा उचल करण्यासाठी दिवसभर कचरा गाडी तैनात करण्यात आली असून कचरा उचल सुरु राहणार आहे. याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंट ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या बरोबरच बंदर जेटी येथे बंद असलेले सुलभ शौचालय नागरिक व पर्यटक यांसाठी सुरु करण्यात आले आहे. बंदर जेटी परिसरातील बंद लाईट व्यवस्था, तेथील प्रसाधन गृहाची झालेली दुरावस्था व पसरलेली दुर्गंधी, तसेच मच्छिमार्केट येथील सेल्फी पॉईंटकडे साठलेला कचरा व दुर्गंधी याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यावर आम. निलेश राणे यांनी रात्रीच्या वेळी पाहणी करत याबाबत उपाययोजना करण्यात न आल्याबाबत नगरपरिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. आमदार निलेश राणे यांनी समस्यांची पाहाणी करताच प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जनतेच्या मागणीला प्राधान्य, काम करण्याची इच्छा सोबतच प्रशासनावर पकड असली की तात्काळ रिझल्ट मिळतोच हे आमदार निलेश राणे यांनी आमदारकीच्या पहिल्याच महिन्यात मतदारसंघातील अनेक जनहिताच्या समस्या सोडवून दाखवून दिले आहे, असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts