कणकवली(प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी खा.नारायण राणे यांनी आग्रही भुमिका घेतल्यानंतर बीएसएनएलची यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. केंद्रीय दुरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही बीएसएनएल नेटवर्क सेवा तातडीने सुरळीत करण्यात येत असून येत्या चार महिन्यात मे-जून पर्यंत ४ जी सेवेत अपग्रेडेशन पुर्ण करण्यात येतानाच सिंधुदुर्गात हायस्पीड इंटरनेट सेवाही अधिक सक्षम करण्याबाबतच्या सुचना दुरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्या आहेत.
खा.नारायण राणे यांना या सेवेबाबतची माहीती मंत्र्यांनी नुकतीच विशेष पत्राव्दारे दिली. सिंधुदुर्गातील बीएसएनएलच्या ४ जी सॅच्युरेशन प्रकल्पांतर्गत १८७ साइट्स (१५५ नवीन साइट्स आणि ३२ विद्यमान २जी/३ जी साइट्स) नियोजित आहेत. त्यापैकी २५टॉवर्स कार्यान्वित झाले आहेत. आता ४ जी अपग्रेडेशनसाठी ३२३ साइट्स (३८ नवीन ४ जी साइट्स आणि २८५विद्यमान साइट्स) नियोजित आहेत. ज्यापैकी ४ साइट्स कार्यान्वित झाल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत उर्वरित ठिकाणे जून २०२५ पर्यंत कार्यान्वित होणार आहेत. इंटरनेट सेवाही गतीमान करणार बँडविड्थची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि मोबाइल, लीज्ड लाइन ग्राहकांच्या उच्च बँडविड्थची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सिंधुदुर्गात ३२ ट्रान्समिशन नोड्सची योजना आहे जी लवकरच कार्यान्वित केली जातील. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी १६०० जीबीपीएस क्षमतेचा हाय स्पीड ट्रान्समिशन नोड स्थापित केला जात आहे. शिवाय, बॅकहॉल नोड्स (पीई राउटर, बीएनजी) तैनात करण्याचे काम प्रक्रियेत आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल. नेटवर्क उपलब्धतेत सुधारणा करण्यासाठी, पूर्वी सुरू केलेल्या ४१ बॅटरी सेट आणि १५ पॉवर प्लांट व्यतिरिक्त अतिरिक्त ३५ बॅटरी सेट आणि १२५ पॉवर प्लांट वाटप केले जात आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनंतर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास खा. नारायण राणे यांना मंत्री सींधीया यांनी दिला आहे. यावेळी खा. नारायण राणे यांनी सेवा देताना दर्जा आणी सातत्य हवे याबाबत मंत्री महोदयांचे लक्ष वेधले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.