loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रिकेट खेळताना मैदानातच कोसळला, तरुणाचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) - क्रिकेट खेळताना मैदानावर कोसळलेल्या सर्जेकोट पिरावाडी येथील मच्छीमार निलेश रमेश आडकर (वय ३४) याचे सोमवारी सायंकाळी आकस्मित निधन झाले. निलेश आडकर हा सोमवारी आपल्या मित्र परिवारासोबत क्रिकेट खेळत असताना अचानक जमिनीवर कोसळला होता. त्याला मित्रांनी तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू ब्रेन हँबरेज मुळे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याच्या निधनाने कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे. त्याच्यावर मंगळवारी अंतिम संस्कार करण्यात आले. तो अविवाहीत होता. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी, काका, पुतणे असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts