loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत एम.आय.हजवानी शाळेच्या विद्यार्थ्यांची विजयी परंपरा कायम

खेड (वार्ताहर) : अल् मदिना वेलफेअर असोशिएशन व्दारा संचलित एम. आय. हजवानी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५२ व्या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत बाजी मारली. माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी.आणि नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ, नाणीज संचलित माध्यमिक विद्यामंदिर ऍण्ड ज्युनिअर कॉलेज नाणीज, ता.जि. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानप्रदर्शन संपन्न झाले. या विज्ञानप्रदर्शन स्पर्धेत विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला. आव्हानात्मक व बौधीक कसोटी पणाला लावणार्‍या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत माध्यमिक गटातून एम.आय.हजवानी शाळेच्या कु. तिसेकर अफिफा कादिर ( इयत्ता ९वी) व कु. खोत उबेद अब्दुल समद (इयत्ता ९वी) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून विजयाची परंपरा कायम ठेवली. तिसर्‍यांदा प्रथम क्रमांक पटकावून या यशस्वी विद्यार्थ्यांनी कष्ट व मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे सिद्ध करून दाखवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अल्-मदिना वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, उपाध्यक्ष सिकंदर जसनाईक, संस्था सचिव हनिफ घनसार, सहसचिव गुलाम मोहिद्दीन तांबे, स्कूल कमिटी चेअरमन निसार खतीब, दुर्वेश पालेकर, खजिनदार आरीफ मुल्लाजी, सहखजिनदार निसार सुर्वे, संचालक मन्सूर मुकादम, शौकत मुजावर, सिराज पटेल, वहाब बिजले, जिब्रान हजवानी, महामुद हजवानी, अखलाक हजवानी, हनिफ तांबे, इब्राहीम हजवानी, आदम हजवानी या सर्व पदाधिका-यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts