loader
Breaking News
Breaking News
Foto

जीत-कुने-दो-मार्शलआर्ट स्पर्धेमध्ये सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

वेळणेश्वर(प्रतिनिधी) - जित-कुने-दो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा असोसिएशन द्वारे वेळणेश्वर येथे १४ जानेवारी २०२५ रोजी क्लब लेवल स्पर्धेचे आणि बेल्ट ग्रेडेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठी कामगिरी करून पदके मिळवली. स्पर्धेचे उद्घाटन आणि वितरण राष्ट्रीय खेळाडू आणि रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी सौ. रुपाली पालशेतकर, तसेच जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, पत्रकार उमेश शिंदे, माजी सरपंच संदीप गावणंग, शांताराम भुवड, गणपत पालशेतकर, गंधार ठाकुर सर तसेच राष्ट्रीय खेळाडू चिन्मय पाद्ये आणि प्रेमकुमार सुर्वे या सर्वांच्या उपस्थितीत स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालेले विदयार्थी मायरा प्रावीण्य जागकर, पंक्ती देवेंद्र सुर्वे, मीत लतिश मोरे, अद्विक गंधार ठाकूर, शार्विल अहंकार ठाकूर, साधवी सिद्धेश जाक्कर, श्रव्य प्रज्ञेश पालशेतकर, स्मरणिका प्रीतम नाटेकर, श्रेज प्रथमेश पालशेतकर, अविक्षा विशाल अडूरकर, श्रव्य महेश अडूरकर, शृंगी नितीन धातकर, स्वरा ओंकार ठाकूर, अंतरा महेश अडूरकर, आराध्य अहंकार ठाकूर, प्रांश अजित मोरे, अवनी गंधार ठाकूर यांनी मिळवले. स्पर्धेमध्ये रौप्य पदक शृवी प्रथमेश पालशेतकर, स्नीजा विवेक शिरगावकर, श्रोन मंदार पालशेतकर, शिवांश सुशेष अडूरकर, प्रांश गणेश वेळणकर, आर्वी प्रतीक मोरे, श्रीजा विलास धोपावकर, शर्वरी संदीप मोरे, ग्रिवा अमर शिरगावकर, अन्वेश दिनेश नाटेकर, समर संदीप मोरे, जीनल लक्ष्मण मोरे, शरण्या सुमित अडूरकर, द्विज तेजस पावरी, श्रीजय विद्याधर जाक्कर यांनी मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts