रत्नागिरी (प्रतिनिधी) - राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विसावा सोशल फाउंडेशन पुणे आणि हिरकणी महिला विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी पत्रकार भवन, पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. विकास साखळकर महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली १७ वर्ष रक्तदान हाच छंद मानून दर तीन महिन्यांनी स्वतः रक्तदान करणारे आणी जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना मोफत रक्तदानाचे कार्ड उपलब्ध करून देणे, रक्त उपलब्ध नसल्यास रक्तदाता उपलब्ध करून देणे हीच विकास साखळकर यांची नित्यनेमाची कामे झाली आहेत, गेल्या १७ वर्षात त्यांनी स्वतः ४९ वेळा रक्तदान केल आहे. या ४९ पैकी तातडीची आवश्यकता असताना त्यांनी ३७ वेळा रक्तदान केले आहे. आणी या ३७ पैकी २९ वेळा गर्भवती मातांना तातडीची आवश्यकता असताना रक्तदान केल आहे. कोविड काळात तर त्यांनी दोन रक्तदान शिबिरे घेतली, पहिल्या शिबिरात त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला आपल्या चालक बांधवांनमार्फत ४० बाटल्या रक्त उपलब्ध करून दिल्या, तर दुसर्या वेळी घेतलेल्या शिबिरात त्यांनी आपल्या मित्र परिवारांमार्फत २३ रक्त बाटल्या उपलब्ध करून दिल्या स्वतः सोबतच त्यांनी अनेक लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले. यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी विकास साखळकर यांच्या या कामाची दखल घेतलेली आहे, आजपर्यंत त्यांना १)आदर्श रक्तदाता, २०२१ २)डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,२०२२ ३) आदर्श समाज रत्न पुरस्कार २०२३, ४) विक्रमी रक्तदाता २०२४, ५) समाजभूषण पुरस्कार २०२४ असे पुरस्कार मिळाले आहेत.
विकास साखळकर यांची कन्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णकन्या म्हणून प्रसिद्ध असलेली स्वरा विकास साखळकर हिचाही या कार्यक्रमात क्रीडा प्रकारातील भरीव कामगिरीमुळे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करणार्या स्वरा साखळकर हिची हिरकणी महिला विकास संस्थेने दखल घेत हा पुरस्कार तिला दिला तायक्वांदो खेळात तिने आजपर्यंत २४ सुवर्णपदके १६ रौप्यपदके तर, १२ कांस्यपदके अशा एकूण ५२ पदकांचा पाऊस पडला आहे. नुकत्याच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पदके मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते यापूर्वी स्वरा हीला युथ आयडॉल या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पुणे येथे झालेल्या कालच्या कार्यक्रमात विकास साखळकर आणि स्वरा यांना लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता ध्रुव दातार, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती ताई देसाई तसेच हिरकणी महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शर्मिलाताई नलावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विकास साखळकर हे स्वतः एक चालक म्हणून काम करत असताना त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे, तर स्वरा ही इयत्ता सहावी मध्ये शिकत असून दामले शाळेची विद्यार्थिनी आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.