loader
Breaking News
Breaking News
Foto

पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा उल्लेख न बदलल्यास आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी (वार्ताहर) : पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत असून खरा इतिहास मिटविण्याचे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. हा खोटा इतिहास तात्काळ बदलण्यात यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र शासनाने इंग्रजी व मराठी माध्यमात्रा इयत्ता ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान क्र. २४ वर वि. दा. सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधले अशा स्वरुपाचा खोटा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. वास्तविक देशातील पहिले प्रतितपावन मंदिर दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. तसा शिलालेख १९३१ साली पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारच्या कमानीवर आहे, त्याची छायांकीत प्रत सोबत जोडाली आहे.

टाइम्स स्पेशल

याबाबतचे निवेदन दिनांक ३०/११/२०२३ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्था यांच्यामार्फत लाक्षणीक उपोषण करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts