loader
Breaking News
Breaking News
Foto

आसुद येथे २१ जानेवारीपासून रंगणार राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धैचा थरार

दापोली(प्रतिनिधी)- संघर्ष क्रिडा मंडळ आसुद, तालुका दापोली येथे दापोली तालुका कबड्डी असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्येतेने २१ जानेवारी ते २३ जानेवारी २०२५ दरम्यान राज्यस्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धा होणार आहे. ही कबड्डी स्पर्धा संघर्ष क्रिडा मंडळ आसुदला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आसुद येथील संघर्ष क्रिडा मंडळाच्या वतीने दापोली हर्णे मार्गावर आसुद धरण स्टॉप जवळ आसुद सहकारी सोसायटी शेजारी मंगळवार दि. २१ जानेवारी ते गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ दरम्यान ३ दिवसाच्या कालावधीत दररोज सांयकाळी ६ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेत राज्यभरातील एकुण १२ कबड्डी संघ सहभागी होणार असून यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, वाशिम आदी कबड्डी संघामध्ये अजिंक्यपदासाठी चुरस लागणार आहे. या स्पर्धेत प्रो - कबड्डीस्टार अजिंक्य पवार, शुभम शिंदे आदी खेळाडूंसह एकापेक्षा एक दिग्गज अशा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपूर्ण खेळ पाहण्याची सुवर्णसंधी दापोली तालुक्यासह रत्नागिरी तसेच जवळच्या रायगड जिल्ह्यातील कबड्डी रसिकांना संघर्ष क्रिडा मंडळ आसुद, ता. दापोलीच्या आयोजनामुळे प्राप्त होणार आहे. अशी ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी कबड्डी रसिकांनी तसेच क्रिडा प्रेमींनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आयोजकांचे मनोबळ वाढवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष क्रिडा मंडळ, आसुदचे अध्यक्ष नितीन बांद्रे, सचिव निलेश बांद्रे, उपाध्यक्ष संजय बांद्रे यांनी सर्व हितचिंतक व सदस्यांच्या वतीने सर्वांना केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts