loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण पंचायत समितीच्या क्रीडा महोत्सवाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते मशाल पेटवून उदघाटन

मालवण(प्रतिनिधी)- मालवण पंचायत समिती यांचा वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातील तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उदघाटन टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे गटविकास अधिकारी तथा प्रशासक प्रफुल्ल वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ वाढवून तसेच ज्योत प्रज्वलीत करून मशाल पेटवत क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, उपअभियंता बांधकाम विभाग संतोष सावर्डेकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती व्ही के जाधव, विस्तार अधिकारी पी.डी, जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीकृष्ण सावंत, आरोग्य पर्यवेक्षक सुरज बांगर यांसह सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, पंचायत समितीचे सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी, तसेच हडी व कोळंब गावचे सरपंच व उपसरपंच, पंच आदी उपस्थित होते. सर्वांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणधिकारी संजय माने यांनी करताना क्रीडा स्पर्धेची रुपरेषा स्पष्ट केली. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही विचार मांडले. तसेच सर्व सहभागी यांना शुभेच्छा दिल्या. अधिकारी, कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून दिवसभर विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts