loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवलीत एटीएसची कारवाई; दोन बांग्लादेशी महिलांना घेतले ताब्यात

कणकवली(प्रतिनिधी)- दोन बांगलादेशी महिला विना पासपोर्ट अथवा कागदपत्रांशिवाय कणकवलीत असल्याची माहिती सिंधुदुर्ग एटीएस पथकाला मिळाली त्यानंतर एटीएस पथकाने या दोन महिलांना ताब्यात घेतले. कणकवलीत बांगलादेशी महिला सापडल्याने त्या नेमक्या कशासाठी आल्या होत्या? कुठे राहिल्या होत्या? याबाबत संभ्रम आहे. कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएसच्या पथकाने १५ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता पकडले. साथी अतुल माझी (वय वर्षे ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम शेख (वय २८, सध्या रा. बी विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर पुणे, मूळ रा. ढाका बांगलादेश) अशी दोन्ही महिलांची नावे आहेत. एटीएस पथकातील पीएसआय सुखदेव शेवाळे, एएसआय उन्मेष पेडणेकर, पोलीस नाईक रोहन चंद्रकांत सावंत यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रुपेश गुरव, अंमलदार किरण मेथे, महिला अंमलदार सुप्रिया भागवत यांनी ही कारवाई केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन बांगलादेशी महिला विना पासपोर्ट अथवा कागदपत्रांशिवाय कणकवलीत असल्याची माहिती ए टी एस पथकाला मिळाली होती. त्यानुसार एटीएसचे पथक मध्यरात्री ३ वाजल्यापासून कणकवलीत दाखल झाले होते. दरम्यान कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांसह एटीएसच्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशनवर दबा धरला होता. पहाटे साडेपाच वाजता दोन बांगलादेशी महिलांना पकडून कणकवली पोलीस ठाण्यात आणून कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची फिर्याद एटीएस पथकाचे पोलिस नाईक रोहन सावंत यांनी दिली आहे. विदेशी पारपत्र कलम १४ अ पारपत्र १९५० नियम ३A ६ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts