loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी येथे आढळून आला अनोळखी तरुणाचा मृतदेह

वैभवाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी शहरातील पोलीस स्टेशन समोरील पेट्रोल पंपावर ३० ते ४० वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत चर्चा वैभववाडी शहरात सुरू आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. गुरुवारी सकाळी पेट्रोल पंपाच्या मालक यांच्या ही घटना निदर्शनात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्याने वैभववाडीत सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस अजित पडवळ, हरेश जायभाय, अभिजीत तावडे, जितेंद्र कोलते, समीर तांबे, अजय बिलपे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली व पंचनामा केला असता पोलिसांना ओळखीचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. वैभववाडी नगरपंचायतीच्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts