loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरात तरुणांमध्ये अमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण

केळंबे, लांजा (वार्ताहर) - लांजा शहरात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांचे सेवन करण्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष करून यामध्ये सध्या काही महाविद्यालयीन तरुण देखील अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. तरूणांना पुरवठा करणार्‍याचा शोध घेऊन थेट त्याच्यावरच कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. लांजा शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थाची विक्री आणि सेवन यामुळे भावी पिढी या अमली पदार्थाच्या आहारी जात असून तरूण बरबाद होत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. अमली पदार्थाच्या सेवनामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. यापुर्वीही या विरोधात लांजातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाई करण्याची मागणी लांजा पोलीस निरीक्षक, लांजा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. पोलिसांनी देखील कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र सध्या ही कारवाई थंडावल्याने पुन्हा एकदा विक्री व सेवन प्रकरणाने डोके वर काढले आहे. याची माहिती घेऊन त्याच्यावरच थेट कारवाई करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts