loader
Breaking News
Breaking News
Foto

पाजपंढरी येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ

दापोली- कोकणची भूमी सगळ्याच क्षेत्रात अव्वल आहे. मी जरी पुण्याची असले तरी माझी 19 वर्ष या कोकणच्या भूमीमध्ये गेली आहेत. मला या गोष्टीचा अभिमान आहे. तेंव्हा स्नेहबंध जे काय कार्य करत आहे त्या कार्याला कायम स्वरूपी माझं सहकार्य असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष तथा दापोली नगरपंचायत नगरसेविका सौ. साधना बोत्रे यांनी सांगितले. स्नेहबंध पाजपंढरी आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी यावर्षीचा ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार हा जनार्दन कानू वाघे उर्फ जेके यांना देण्यात आला. पहिल्या दिवशी रंगोदय रूपांतर मुंबई - जर्नि ऑफ सर्वाव्हर, नाट्य नाद मुंबई - कस्टमर केअर या दोन एकांकिकांचे सादरीकरण झाले. सदरच्या एकांकिकांना उपस्थित रसिक प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा 15 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत र् होणार आहेत. दि. 19 जानेवारीला स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, रत्नागिरी ठाणे, कोल्हापूर आदी ठिकाणाहून 19 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा पाजपंढरी येथील श्रीराम मंदिराच्या बाजूला समुद्रकिनारी आयोजित करण्यात आली आहे. सदरच्या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समिती सदस्य- मोहन मुळ्ये, कमलाकर वाघे, पांडुरंग पावसे, डी. एम वाघे, केशव वाघे, परीक्षक म्हणून डॉ. सतीश शिंदे व मराठी अभिनेत्री गायत्री गायखे कामगिरी बजावत आहेत. सदरच्या कार्यक्रमाला बहुसंख्य रसिकप्रेक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts