मंडगणड(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील भादाव येथून मंडगणड तालूक्यातील पालवणी गोसावीवाडी येथे पाहुणाचारासाठी आलेल्या जावयाने 3 जानेवारी 2025 रोजी सासूरवाडीतील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. त्या चोरट्या जावयाला मंडगणड पोलीसांनी शिताफीने पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या. मंडणगड पोलीसांच्या या महत्वाच्या चोरीचा छडा लावणा-या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भादाव येथे राहणारा आणि मंडणगड पालवणी येथील गोसावी वाडीचा जावई असलेल्या समिर शंकर गोसावी हा पाहुणा म्हणून पाहुणाचारासाठी सासुरवाडी पालवणीत आला होता. एके दिवशी सासू बचत गटाच्या मिटींगसाठी वाडीत गेली असता जावयाने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन तोळयाचे मंगलसुत्र अंदाजे 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन त्याने पोबारा केला. ही बाब सासूबाई घरी आल्यावर तीच्या लक्षात आली. आणून देईल या भाबड्या आशेने सासू सास-याने वाट पाहिली मात्र तो काही चूकूनही परत फिरकला नाही. त्यामुळे अखेर सासरे शिवाजी पांडुरंग नवघरे वय( 54 ) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकारची 8 जानेवारी 2025 रोजी चोरीची जावई विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत समिर गोसावीला धुंडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मोबाईल च्या लोकेशनव्दारे काही ट्रेस लागत नव्हता. तपासात दिरंगाई न करणा-या मंडणगड पोलीसांना तो म्हाप्रळ येथे बायकोला भेटण्यासाठी येणार असल्याचा गोपणीय माहितीच्या आधारे सुगावा लागला आणि समिर अलगद पोलीसांच्या हाती सापडला.
मंडणगड पोलीसांनी केलेल्या या सातत्यपूर्ण तपासामुळे चोरटयाला जेरबंद करण्यास यश आले आहे. ही महत्त्वाची कामगिरी मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना /817 मांडवकर,पोउनि /धूपकर, चालक पोहावा /1128 देसाई अशी टिम म्हाप्रल येथे साद्या गणवेशांत रवाना झाली. तेथे गोपनीयरित्या आरोपी याचा शोध घेऊन एका ठिकाणी दबा धरुण बसलो. ठिक 13.10 वा आरोपी हा त्याच्या पत्नी भेटण्यासाठी म्हाप्रल येथे येताच त्यास शिताफिने ताब्यात घेतले. व गुन्ह्याच्या पुढील चौकशीकरीता पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे गुन्हा बाबत चौकशी केली असता आरोपी याने गुन्हा केल्याचे कबूल केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.