loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरवाचनालयाच्या नववास्तू निर्मितीसाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आर्थिक योगदान द्यावे - अ‍ॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने नुकतेच 198 या वर्षात पदार्पण केले इतकी प्रदीर्घकाळ चालणारी रत्नागिरीतील ही एकमेव पुरातन संस्था असावी. 1 लाख 15 हजारांच्या ग्रंथसंपदेसह हे वाचनालय दुर्मिळ पुस्तकांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. जुनी इमारत 52 वर्षांपूर्वी उभारली होती. ती जीर्ण झाली असल्याने ती पाडून नवी इमारत बांधणे अनिवार्य होते. यास्तव उचित परवानग्या घेऊन वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले असून नवी दुमजली 11500 चौरस फुटाची इमारत अल्प कालावधीत उभी करण्याचे ध्येय आहे. जानेवारी 2027 मध्ये वाचनालयाचा द्वीशताब्दी महोत्सव सुरू होतो त्यापूर्वी हे वाचनालय नव्या वास्तूत स्थिरस्थावर करण्याचे उद्दिष्ट आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या इमारतीत तळमजल्यावर वाचक कक्ष व पुस्तक मांडणी विभाग, पहिल्या मजल्यावर प्रशस्त सभागृह, दुसर्‍या मजल्यावर अभ्यासिका, बाल व महिला वाचक विभाग व डिजिटल रूम असा आराखडा बनवला आहे. या सर्व कामासाठी 3 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 1 कोटी 20 लाख वाचनालयाने उभे केले आहेत. उर्वरित रकमेसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे वाचनालय हे रत्नागिरीचे वैभव आहे. सुसंस्कृत, शालिन रत्नागिरीची ओळख देणारे हे वाचनालय त्याची नवीन वास्तू उभी राहत असताना प्रत्येक रत्नागिरीकराचे योगदान स्वयंस्पुर्तीने या बांधकामासाठी मिळाले तर नूतन वास्तू लोकसहभागाच्या बळावर वेगाने उभी राहील. यास्तव सर्वांना रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे पुनर्बांधणीसाठी आर्थिक योगदान देण्याचे विनम्र आवाहन करीत आहे.

टाईम्स स्पेशल

आपल्या वाचनालयाची नूतन शानदार वास्तू उभी राहावी यासाठी रत्नागिरीकरांनी स्वेच्छेने योगदान द्यावे हे योगदान रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेविंग खात्यात खाते क्रमांक 1611006022828, आयएफ एससी कोड 0574 आरडीसी या खात्यात आरटीजीएस/ एनईएफटी द्वारा अगर धनादेशाचे माध्यमातून जमा करू शकता. आयकर कलम 80जी नुसारची सवलत प्राप्त करण्यास हे डोनेशन पात्र आहे. सर्वांनी यथोचित योगदान द्यावे असे विनम्र आवाहन वाचनालयाचे वतीने अ‍ॅड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts