loader
Breaking News
Breaking News
Foto

विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकरांनी घेतले श्रीदेवी सातेरीचे दर्शन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कोंकणात पर्यावरण आणि पर्यटनाला चालना मिळेल असे प्रकल्प यावेत म्हणून मी निश्चित प्रयत्न करेन. तसेच महाराष्ट्र विधानसभेत राज्याला योग्य न्याय मिळेल असे माझे प्रयत्न राहणार आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथे केले. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी त्यांचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मातोंड (तालुका वेंगुर्ला) येथे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी मातोंड गावच्यावतीने दादा परब व त्यांचे सर्व सहकारी मानकर्‍यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी, सरपंच, वेंगुल्याचे पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी उपस्थित राहून अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील राजकीय जीवनात यशस्वी होण्याबाबत सदिच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts