loader
Breaking News
Breaking News
Foto

जपानमध्ये स्थापित करण्यात येणार्‍या शिवरायांच्या मूर्तीचे मालवणात भव्य स्वागत

मालवण(प्रतिनिधी)- जय भवानी... जय शिवाजी... छत्रपाती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा देत... ढोल ताशांचा गजर करीत आणि भगवे ध्वज फडकवत आज मालवणातील तमाम शिवप्रेमी नागरिकांनी जपान येथे आम्ही पूणेकर या ग्रुपतर्फे स्थापित केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीच्या शिवस्वराज्य रथयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी उपस्थित महिलांनी या मूर्तीचे औक्षण केले. ही मूर्ती दर्शनासाठी एक दिवस मालवणात ठेवण्यात येणार असून त्यानंतर मूर्ती गोव्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. ’आम्ही पुणेकर’ या जपानमधील ग्रुपतर्फे जपान मधील टोकीयो येथे दि. 8 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची आठ फुटी अश्वारुढ मूर्ती उभारण्यात येणार असून या मूर्तीची भारतातील नऊ राज्यांमधून शिवस्वराज्य रथयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा शुभारंभ सातारा येथे झाल्यानंतर तेथून विविध ठिकाणाना भेट देत ही यात्रा आज सायंकाळी मालवणात दाखल झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुंभारमाठ येथे ही यात्रा दाखल झाल्यावर तेथून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मालवण भरड नाका येथे यात्रा दाखल झाल्यावर मालवणातील शिवप्रेमी नागरिकांकडून व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून यात्रेचे स्वागत करण्यात आले. भरड येथे ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच 58 महाराष्ट्र बटालियनचे जवान व अधिकारी तसेच एनसीसी विद्यार्थी यांनीही मूर्तीला अभिवादन केले. यावेळी आम्ही पुणेकर ग्रुपचे अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार उत्तम मांढरे, डॉ. नितीन चांगदेव लचके, अमर भूतकर, मंगेश मांढरे यांसह ग्रुपच्या महिला सदस्य तसेच प्रभाकर सावंत, बाबा मोंडकर, भाऊ सामंत, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, सौ. शिल्पा खोत, सौ. प्रीती सावंत, हरी खोबरेकर, यतीन खोत, महेश कांदळगावकर, बबन शिंदे, किसन मांजरेकर, पंकज सादये, अन्वेषा आचरेकर, सोनाली पाटकर, सौरभ ताम्हणकर, प्रा. एम. आर खोत, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर आदी व इतर तमाम शिवप्रेमी नागरिक, महिला आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts