loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण हे सभ्यतेचे प्रतीक आहे- राहुल नार्वेकर

मालवण (प्रतिनिधी)- कोकण हे सभ्यतेचे प्रतीक आहे. याच सिंधुदुर्गात राजकीय संस्कृतीत सभ्यता ठेवण्याचे कार्यही झाले आहे. याच कोकणचा माणूस आणि सिंधुदुर्गातील एक सुपुत्र मुंबईत जाऊन आमदार होतो ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नसून ही किमया व कमाल सिंधुदुर्गवासियांनी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर केलेल्या संस्कारांची आहे. या कोकणला न्याय मिळवून देणे आणि त्याव्दारे विकास अटल ठेवणे हे माझे कर्तव्य नाही तर धर्म आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पेंडुर येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र विधानसभेचे सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद भूषवित असलेले विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मालवण पेंडूर येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री देवी जुगाई मांड उत्सवाला भेट देत श्री देव वेताळ व श्री देवी जुगाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्ट कमिटी, पाच बारा मानकरी, गावकर मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री नार्वेकर हे बोलत होते यावेळी कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक सावंत पटेल, सचिव ऍड अमित रेगे कुलकर्णी, खजिनदार सुनील परब, दाजी सावंत, रमेश सावंत, दिलीप परब, प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, दीपा सावंत, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रा प सदस्य वैष्णवी लाड, अश्विनी पेडणेकर अंकिता सावंत ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती कोठावळे रामू सावंत, भाऊ पटेल, संदेश नाईक, शेखर फोंडेकर, अमित सावंत, संतोष सावंत, यश नाईक व अन्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts