loader
Breaking News
Breaking News
Foto

नरेंद्रचार्या महाराज संस्थान आयोजित दाभोळ येथे रक्तदान शिबिर संपन्न

दाभोळ (स्वप्नील घटे) - तुम्ही जगा दुसर्‍याला जगवा हे ब्रिद घेऊन चालणार्‍या जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्या महाराज जगद्गुरु रामानंदचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम (महाराष्ट्र) यांच्यावतीने शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.५० ते सायंकाळी ५.५० दिवसभरातील कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र दाभोळ तालुका दापोली येथे केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिर यशस्वी होण्यासाठी परेश वाडकर, सुनील दाभोळकर यांनी मेहनत घेऊन या शिबिरात उत्तम सेवाकार्य केले. या रक्तदान शिबीराला दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ राखी तोडणकर, उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मृदुला गोयथळे, मिलिंद गोयथळे, दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, स्कवेयर शिपायर्ड दाभोळचे हेड बोकाडे, अजय खोपटकर, जिल्हा देणगी प्रमुख सुनील दाभोळकर, तालुका सेवा अध्यक्ष विजय खोपटकर, तालुका संजीवनीं प्रमुख जगदीश मांडवकर, तालुका युवा प्रमुख, विशा पोमेंडकर, ऍम्ब्युलन्स प्रमुख आशिष पोमेंडकर, तालुक जनगणना प्रमुख सुरेश कासेकर, दिनेश जावळे (कॅप्टन), प्राची म्हातले, तालुका शिबीर प्रमुख परेश वाडकर, राकेश मुळूख, काशीराम मुळूख, वैभव केळकर, विलास कोलंबेकर, विभव शेट्टे, सौ नम्रता धोपावकर, सौ स्मिता खेऊर,सौ विनया तोडणकर, सौ सुलभा तोडणकर, त्याचप्रमाणे दाभोळ विभागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts