loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा महासंमेलनास रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

रत्नागिरी (टाइम्स न्यूज नेटवर्क) : अखिल मराठा फेडरेशनच्यावतीने रत्नागिरीत सुरु झालेल्या दोन दिवशीय अखिल मराठा महासंमेलनास समाजाचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रथमच होत असलेल्या संमेलनाची उपस्थिती विशेष आहे. अगदी कमी वेळेत अखिल मराठा फेडरेशनच्यावतीने हे संमेलन आयोजित करुन कोकण, गोवा आणि देशभरातून मराठा समाजाचे अनेक मान्यवर, उच्च विद्याविभूषित, अनेक निवृत्त राज्यसरकारी अधिकारी, निवृत्त शिक्षक, प्रसिद्ध उद्योजक, विविध क्षेत्रात दर्जेदार काम करणारी अनेक मान्यवर मंडळी मराठा संमेलनात सहभागी झाली आहेत. विशेष म्हणजे खासदार नारायण राणे हे या संमेलनाच्या पहिल्या दिवशी सहभागी झाले आहेत. त्यांचे मार्गदर्शन महासंमेलनात मोलाचे ठरणार आहे. या महासंमेलनाच्या निमित्ताने समाजातील अनेक कर्तबगार व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल मराठा फेडरेशन आणि मराठा बिझनेसमन फोरमचे संस्थापक कै.शशिकांत उर्फ आप्पासाहेब यांना मरणोत्तर जीवनगौरव प्रदान करण्यात येणार आहे. महासंमेलनात सुरुवातीलाच रत्नागिरीतील अनेक मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्रीराम मंदिर रत्नागिरीच्या अध्यक्षा आणि दै.रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका सौ.उर्मिला उल्हास घोसाळकर यांचा यथोचित सन्मान कार्यक्रमस्थळी करण्यात आला. मंचावर आणि मंचासमोर अनेक मान्यवर आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts