loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीगमध्ये विद्यानिकेतनचे विद्यार्थी अव्वल

दोडामार्ग,(प्रतिनिधी) - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence ) युगात विद्यार्थ्यांना लहान वयातच तांत्रिक ज्ञान आणि बारकावे शिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीगचे आयोजन केले जाते. ३ री ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत नंबर सिस्टीम, रिक्रेशन फंक्शन, ग्राफ थिअरी, प्रोग्रामिंग लॉजिक यांसारख्या तांत्रिक विषयांचा समावेश असतो. विविध देशांतील शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. या वर्षी भारतातून एकूण ५ संघ सहभागी झाले असून त्यापैकी ३ संघ हे विद्यानिकेतन आणि युरेका यांच्या संयुक्त सहभागाने आहेत. विद्यानिकेतन कसालच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धेत आपला ठसा उमटवत पहिल्या फेरीत अव्वल गुण मिळवले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अव्वल स्थान मिळवणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये वेद वाळके, दुर्वा पाटकर, स्वराज सावंत (विद्यानिकेतन, कसाल) यांचा समावेश आहे. तसेच, अर्थव दिसले (कणकवली), प्रसन्ना भगत (नागपूर), मल्हार जाधव (रत्नागिरी) आणि सुमेध देशपांडे (नवी मुंबई) यांनीदेखील अव्वल स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांना युरेकाचे भूषण पांगम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यानिकेतनचे चेअरमन चिराग बांदेकर, सीईओ केणी, संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून आगामी फेर्‍यांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts