loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग येथील शिवसेना उबाठा पदाधिकार्‍यांचे राजीनामे

दोडामार्ग,(प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील काही समाज घटकांवर अन्याय होत असताना दोडामार्ग शिवसेना उबाठा तालुका प्रमुख तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख लक्ष घालत नाही त्यामुळे पक्षावर याचा परिणाम होत आहे. असे सांगत संबधित पदाधिकारी यांच्या कार्यपध्दती वर नाराज होऊन दोडामार्ग येथील सात ते आठ पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा प्रमुख यांना पाठवले आहेत. यामुळे शिवसेना उबाठा गटात चर्चेला उधाण आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील काही घटना घडतात अशा वेळी संबधित वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नसतात. जनतेच्या मागे उभे राहत नाही. त्यामुळे पक्षाला याचा फटका बसत आहे. वरिष्ठ पदाधिकारी तालुका जिल्हा पदाधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन आम्ही राजीनामे सादर केले. असे शिवसेना उबाठा उप जिल्हा संघटक विजय जाधव यांनी सांगितले. शिवसेना उबाठा राजीनामे देणार्‍या पत्रात लक्ष्मण आयनोडकर, तालुका संघटक, संदेश राणे, सोशल मीडिया प्रमुख भिवा गवस, विभाग संचटक, शुभंकर देसाई, उपविभाग प्रमुख युवा गणेश धुरी उपविभाग प्रमुख, संदेश गवस, युवा सेना उप तालुका प्रमुख माटणे यांचा समावेश आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts